प्रेमाला कुठे असते Expiry date! नव्या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर झळकणार मुक्ता- उमेशची जोडी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत लवकरच एका नव्या कोऱ्या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. मुख्य म्हणजे ते तब्बल ८ वर्षांनी या मालिकेमुळे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात आपल्याला हि जोडी पहायला मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघे मिळून प्रेक्षकांना प्रेमात पाडायला आणि प्रेम करायला शिकवणार आहेत. सोनी मराठी या आघाडीच्या वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ या प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या नव्या कोऱ्या मालिकेमध्ये हे दोघे मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची शैली प्रकट करीत मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या केवळ घराघरांत नव्हे तर मनामनांत पोहचली आहे.

तर मराठमोळा अभिनेता उमेश कामत याने टाईम प्लिज, लग्न पाहावे करून, ये रे ये रे पैसा आणि अ पेईंग घोस्ट अशा अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. या चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या मराठी चित्रपटात एकत्र काम केले आहे.

यानंतर थेट तब्बल ८ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अभिनेता उमेश कामत हा सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. यांच्या आगामी मालिकेच्या नावातून आणि जाहिरातीतून इतके सहजोगत्या समजते कि, ही एक प्रेमकथा आहे.

थोडी वेडी, थोडी साधी, थोडी चपलख आणि अनेक विविध प्रेम रंगांनी भरलेली मीरा व आदी यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका येत्या १२ जुलै २०२१ पासून सोनी मराठी या वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

You might also like