मराठा आरक्षण : छत्रपती संभाजीराजे घेणार उदयनराजेंची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी 16 जून ला राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे उद्या उदयनराजेंना भेटणार आहेत. पुण्यात उद्या दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजेंची भेट ठरली आहे. उद्या पुण्यात भेटून दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील  भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like