हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : लवकरात लवकर पैसे कमावण्यासाठी शेअर बाजार उत्तम मानला जातो. आपण यामध्ये जर योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर अवघ्या काही काही महिन्यांतच लाखो रुपये कमवता येतील. मात्र, यात आर्थिक जोखीम देखील असते… कारण जर आपण पैसे गुंतवलेल्या शेअर्समध्ये जर घसरण झाली तर आपले सर्व पैसे गमावले जाऊ शकतील.
तर आज आम्ही तुम्हाला अशा 5 पेनी स्टॉक्सबाबत माहिती देणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 5 महिन्यांत जवळपास 600 टक्के ते 2700 टक्के रिटर्न दिला आहे. पेनी स्टॉक हे असे स्टॉक असतात ज्यांची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते.
Gallops Enterprises
रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित ही कंपनी आहे. ही कंपनी कंस्ट्रक्शन, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट आणि इंजीनियरिंग सर्विसेज देते. या वर्षी या शेअर्समध्ये 4.78 रुपयांवरून 57.10 रुपयांपर्यंत वाढ झाली. या दरम्यान, हे शेअर्स 1094 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये जर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याला 11.94 लाख रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
हेमांग रिसोर्सेज
हेमांग रिसोर्सेस ही एक मेटल कंपनी आहे. यावर्षी कंपनीने गुंतवणूकदारांना 1416 टक्के रिटर्न दिला आहे. या हे शेअर्स 3.12 रुपयांवरून 47.30 रुपयांपर्यंत आहेत. जर कोणी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज ही रक्कम 15.16 लाख रुपये झाली असेल.
बीएलएस इन्फोटेक लिमिटेड
ही कंपनी अकाउंटिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि प्रोडक्शन प्लॅनिंग या क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सर्व्हिस पुरवते. या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्ब्ल 674 टक्के रिटर्न दिला आहे. यादरम्यान त्याचे शेअर्स 66 पैशांवरून 5.11 रुपयांवर आले आहेत. जर एखाद्याने या वर्षी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत ते 7.74 लाख रुपये झाले असतील. Multibagger Stock
अलायन्स इंटिग्रेटेड मेटॅलिक्स
कंपनी विशेष स्टील आणि मिश्र धातूंची उत्पादने तयार करते. यावर्षी कंपनीच्या शेअर्सने 931.69 टक्के रिटर्न दिला. या दरम्यान या शेअर्समध्ये 2.84 रुपयांवरून 29.30 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जर एखाद्याने या वर्षात यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 10.31 लाख रुपये झाली असेल.
कैसर कॉर्पोरेशन
या कंपनीचे 2 विभाग आहेत. यात प्लास्टिक विभाग आहे ज्यामध्ये ती प्लास्टिकचे कंटेनर तयार करते. दुसरा, प्रिटिंग विभाग आहे जिथे क्वालिटी प्रिटिंग , मॅन्युफॅक्चरिंग तसेच कार्टन्स बनवले जातात. 3 जानेवारीला या कंपनीचे शेअर्स 2.92 रुपयांवर होते जो आता वाढून 83.40 रुपये झाला आहे. गेल्या 5 महिन्यांत या स्टॉकने 2756 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.livemint.com/market/stock-market-news/multibagger-stocks-these-5-shares-give-up-to-1765-return-in-jan-march-2022-11648877849204.html
हे पण वाचा :
Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत घट, सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या
‘DUNKI’ म्हणजे काय??? शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या थीमविषयी जाणून घ्या !!!
EPF कि NPS यापैकी रिटायरमेंटसाठी कोणती योजना चांगली आहे हे समजून घ्या
Bank FD : जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!