हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. हे जाणून घ्या कि, गुंतवणूकदारांना अल्प तसेच दीर्घ कालावधीमध्ये मोठा रिटर्न देणाऱ्या शेअर्सना मल्टीबॅगर असे म्हंटले जाते. शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Gujarat Fluorochemicals चे शेअर्स देखील त्यांपैकीच एक आहेत. केमिकल सेक्टर मधील या दिग्गज कंपनीच्या शेअर्सने गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 988 टक्के रिटर्न दिला आहे.
मात्र, सध्या या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या एका महिन्यात यामध्ये सुमारे 15 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ज्यामुळे सध्या हे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. 28 डिसेंबर रोजी गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 3,126.00 रुपयांवर बंद झाले. Multibagger Stock
ब्रोकरेज हाऊसने दिला खरेदीचा सल्ला
या शेअर्समध्ये घसरण होऊनही तज्ञ यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही देत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने यासाठी 4270 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. याचा अर्थ असा कि, भविष्यात यामध्ये सध्याच्या किंमतीपासून 41% ची वाढ होण्याची शक्यता आहे. Multibagger Stock
मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे बाजारात झालेल्या घसरणीदरम्यान, गुजरात फ्लोरोकेमिकल्सच्या शेअर्सची किंमत 278.05 रुपये होती. मात्र आता अडीच वर्षांनंतर हे शेअर्स 988 टक्क्यांच्या उसळीने 3025 रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच या वर्षी 12 मे रोजी, या शेअर्सची किंमत 2105.15 रुपये होती. मात्र पुढील 5 महिन्यांत या शेअर्सची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. 6 ऑक्टोबर 2022 रोजी, गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 4172.95 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. Multibagger Stock
व्यवसाय प्रचंड वाढण्याची शक्यता
मूल्यांकनानुसार, ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजला हा स्टॉक खूपच किफायतशीर वाटत आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्याचा निव्वळ नफा 41 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच बरोबर बॅटरी, सोलर पॅनेल आणि ग्रीन हायड्रोजनच्या वाढत्या वापरामुळे फ्लोरोपॉलिमर केमिकलचा मजबूत व्यवसाय होईल, ज्याचा फायदा गुजरात फ्लोरोकेमिकल्सला देखील होईल. या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊनच ब्रोकरेज फर्मने यासाठी बाय रेटिंग कायम ठेवले आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/gujarat-fluorochemicals-ltd/fluorochem/542812/
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण, आजचे दर तपासा
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत दिला 1920% रिटर्न