हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेले काही दिवस शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. मात्र या काळातही असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळवून दिला आहे. Gujarat Containers Limited च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना या घसरणीच्या काळातही मल्टीबॅगर रिटर्न देत आहे. गेल्या 1 वर्षातच या शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांत 4 पटीने वाढ केली आहे. आज सोमवारी देखील यामध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये हे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 199.35 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

113 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेल्या Gujarat Containers Limited ही भारतातील स्पेशियलिटी बॅरलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीकडून दररोज 1,500 बॅरलचे उत्पादन केले जाते. Gujarat Containers Limited च्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 199.35 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 47 रुपये आहे. Multibagger Stock

Gujarat Containers Limited चे शेअर्स दीर्घकाळापासून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देत आहेत. सोमवार, 19 सप्टेंबर रोजी BSE वर सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये या शेअर्सला 5 टक्के अप्पर सर्किट मिळाले. त्यानंतर तो 199.35 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअर्समध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 1 महिन्यात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 82 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

2022 मध्ये हा स्टॉक आतापर्यंत 118.35 टक्क्यांनी वर गेला आहे. गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 109.73 टक्क्यांनी मोठी वाढ दिसून आली आहे. तसेच 3 जानेवारी 2022 रोजी, हे शेअर्स 81 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते जे आता 199.35 रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या 1 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 294.75 टक्के रिटर्न दिला आहे. यावेळी तो 50.50 रुपयांवरून 199.35 च्या पातळीपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock

जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी Gujarat Containers Limited च्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे मूल्य 3,94,752 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने 3 जानेवारी 2022 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे 2,46,111 रुपये झाले असतील. तसेच जर 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे पैसे वाढून 209,731 रुपये झाले असतील. 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणारा गुंतवणूकदार देखील नफ्यात असून त्याला आता 1,81,640 रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://gujaratcontainers.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीत किंचित वाढ, आजचे दर पहा
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा




