Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार सुरू आहेत. मात्र बाजारातील या अस्थिरत्याच्या दरम्यान असेही काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना भरपूर कमाई मिळवून देत आहेत. वेस्ट कोस्ट पेपर मिल्स (WCPM) चे शेअर्स देखील मल्टीबॅगर रिटर्न देणार्‍या शेअर्सच्या लिस्टमध्ये सामील आहेत. या शेअरने या कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 144% रिटर्न दिला आहे.

Westcoast Paper Mills

सध्या या शेअरमध्येही मोठी वाढ पाहायला मिळते आहे. NSE वर, हा शेअर 4.32 टक्क्यांनी वाढून 578 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. इंट्राडेमध्ये हा शेअर आज 5 टक्क्यांनी वाढून 585 रुपयांवर गेला होता. हा त्याचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. याचा 52 आठवड्यांचा नीचांक 217 रुपये आहे. Multibagger Stock

देत आहे भरपूर नफा

वेस्ट कोस्ट पेपर मिल्सच्या शेअर्सने अनेक कालावधीपासून मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या अवघ्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका महिन्यात यामध्ये 56 टक्क्यांनी तर गेल्या सहा महिन्यांत 139.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 बाबत बोलायचे झाल्यास आतापर्यंत हे शेअर्स 144 टक्क्यांनी वाढले आहेत; त्याचप्रमाणे एका वर्षात याने गुंतवणूकदारांना 160 टक्के नफा मिळवून दिला आहे. Multibagger Stock

शेअर्स मध्ये वाढ का झाली ???

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, WCPM डायव्हर्सिफाइड प्रोडक्ट्सच्या निर्मितीमध्ये सामील आहे. तसेच रायटिंग आणि प्रिंटिंग सेगमेंट, सिक्योरिटी आणि हाय व्हॅल्यू ग्रेड पेपरमध्ये देखील त्यांची उपस्थिती वाढवली आहे. ई-कॉमर्स, फूड आणि फूड प्रोडक्ट्स, एफएमसीजी आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील मागणी वाढल्यामुळे पॅकेजिंग पेपर सेगमेंटमध्ये कंपनीने चांगली वाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षात शाळा, महाविद्यालये आणि ऑफिसेस हळूहळू सुरू झाल्यामुळे, मागणी वार्षिक आधारावर यामध्ये 11-15 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या सर्व कारणांमुळे कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. Multibagger Stock

निव्वळ नफा पाचपटीने वाढला

आर्थिक वर्ष 23 च्या एप्रिल-जून तिमाहीत, कंपनीने 208.95 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. यावेळी यामध्ये पाचपटीपेक्षा जास्तीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा 39.20 कोटी रुपये होता. आपल्या मजबूत ऑपरेशनल कामगिरीचा फायदा यावेळी कंपनीला झाला आहे. तिमाही आधारावर त्यांचा निव्वळ नफा 49 टक्क्यांनी वाढून 140.51 कोटी रुपये झाला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.westcoastpaper.com/

हे पण वाचा :

PNB च्या ग्राहकांना आता FD वर घेता येणार कर्ज !!! ‘या’ नवीन सुविधेबाबत जाणून घ्या

Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा

LIC Housing Finance चे होम लोन महागले, व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ !!!

“UPI सर्व्हिससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही”- अर्थ मंत्रालय

PNB देत आहे स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या