हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जागतिक शेअर बाजारात प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारातही अनेकदा चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र या काळातही आतापर्यंत काही निवडक स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सनी मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. Hardwyn India चा देखील अशाच शेअर्समध्ये समावेश होतो. बीएसईवर Hardwyn India च्या शेअर्सने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 476 टक्के रिटर्न दिला आहे. तर 2018 पासून आतापर्यंत, या शेअर्सने 2,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. आता कंपनीकडून लवकरच आपल्या भागधारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स मिळणार आहे.
यासाठी कंपनीकडून 26 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच सोमवारी हे शेअर्स एक्स-बोनस होतील. जर आपण उद्यापर्यंत या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर आपल्याला बोनस शेअर मिळतील. 22 जुलै रोजी BSE वर हे शेअर्स 272.45 च्या किंमतीवर बंद झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये होती. Multibagger Stock
Hardwyn India च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. बीएसईवर 25 एप्रिल 2018 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.98 रुपयांवर होती. गेल्या काही वर्षांत या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 2,624 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 27 एप्रिल 2018 रोजी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर सध्या त्याला 26 लाख रुपये मिळाले असतील. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 272.45 रुपये तर नीचांक 45 रुपये आहे. Multibagger Stock
एक्स-बोनस आणि रेकॉर्ड डेट म्हणजे काय ???
एक्स-बोनस डेट ही ती तारीख असते ज्याद्वारे शेअर्स खरेदी करणाऱ्याला बोनस शेअर्स मिळतात. त्याच वेळी, रेकॉर्ड डेटला कंपनी आपल्या भागधारकांची संख्या आणि इतर डिटेल्स पाहते. इथे एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या की, रेकॉर्ड डेटला शेअर्स खरेदी केल्याने बोनस शेअर मिळत नाहीत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.hardwyn.com/about-us
हे पण वाचा :
खाद्यपदार्थांवर GST का लावण्यात आला ??? महसूल सचिवांनी दिले ‘हे’ कारण
FD Rates : ‘या’ खासगी बँकेने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केले बदल !!!
Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या