हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये 12 सप्टेंबर रोजी देखील वाढ झाली आहे. गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये हे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 3 वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 39,250 टक्के रिटर्न दिला आहे. आता कंपनीकडून आपल्या भागधारकांना प्रति शेअर 5 रुपये दराने डिव्हीडंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. Multibagger Stock
3 वर्षांपूर्वी 3.54 रुपये किंमत असलेल्या पतंजली फूड्सचे शेअर्सची आता 1,415 रुपयांच्या पातळीवर आहेत. सोमवारी (12 सप्टेंबर) पतंजली फूड्सचे शेअर्स वाढीने उघडले. इंट्राडेमध्ये आज हे शेअर्स बीएसईवर सुमारे 1.20 टक्क्यांनी झेप घेऊन 1,415 रुपयांवर पोहोचले. तसेच बातमी लिहेपर्यंत हे शेअर्स 1.09 टक्क्यांनी वाढून 1,390.00 रुपयांवर पोहोचले होते. Multibagger Stock
3 वर्षात भरपूर कमाई
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतंजली फूड्सचे शेअर्स गेल्या 3 वर्षांपासून तेजीत आहे. या दरम्यान या शेअर्सने गुंतवणूकदारांना 39,250 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात हा शेअर 26.35 टक्क्यांनी वधारला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स 44.65 टक्क्यांनी वाढले आहेत. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 63.67 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
मार्केट कॅप 50,000 कोटी रुपयांच्या पुढे
पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे कंपनीची मार्केट कॅप 50,000 कोटी रुपयांच्या पुढे आली आहे. भारतातील खाद्यतेलाची मागणी पूर्ण करणे आणि भारताला या क्षेत्रात स्वावलंबी बनवणे हा आपला हेतू असल्याचे कंपनीने म्हंटले आहे. त्याचबरोबर आता पतंजली फूड्सने यावर्षी भागधारकांना डिव्हीडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. FFCG कंपनीने भागधारकांना प्रति इक्विटी शेअर 5 रुपये डिव्हीडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासाठी 26 तारखेला रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केले आहे. याचा अर्थ असा की हा स्टॉक 23 सप्टेंबर रोजी एक्स-डिव्हिडंड होईल कारण 24 आणि 25 सप्टेंबर रोजी शनिवार आणि रविवार असल्याने शेअर बाजार बंद असेल. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.ruchisoya.com/
हे पण वाचा :
Investment : ‘या’ सरकारी बचत योजना देत आहेत FD पेक्षा जास्त व्याज, त्याविषयी जाणून घ्या
Gold Price Today : सोने घसरले तर चांदीमध्ये झाली वाढ, आजचे नवीन दर पहा
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 197 रुपयांमध्ये मिळवा 100 दिवसांची व्हॅलिडिटी !!!
Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ
Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा