हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. गुंतवणुकदार देखील भरपूर नफा मिळवून देणाऱ्या अशाच शेअर्सच्या शोधात असतात. अशातच जर तो स्टॉक पेनी स्टॉक असेल तर काय सांगावे. आज आपण एकेकाळी पेनी स्टॉक असलेल्या अशाच एका शेअर्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत. आज त्याची किंमत 750 रुपयांच्या वर गेली आहे.
आज आपण लार्ज कॅप कंपनी असलेल्या UPL Limited विषयी बोलणार आहोत. आज त्याची मार्केट कॅप 58,671.05 कोटी रुपयांवर आहे. या कंपनीच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. गेल्या 20 वर्षात हे शेअर्स 1 रुपयांवरून 767 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 63,883.33 टक्के इतका मोठा रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
कंपनीच्या शेअर्सची हिस्ट्री
सध्या या शेअर्सची किंमत 767.80 रुपयांच्या पातळीवर आहे. हे लक्षात घ्या कि, 2002 मधील जुलैच्या सुरुवातीला हे शेअर्स 1.20 रुपयांवर होते. जर कोणी त्यावेळी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज ही रक्कम 6.39 कोटी रुपये झाली असेल. गेल्या 5 वर्षात या शेअर्सने 38.31 टक्के आणि मागील 1 वर्षात सुमारे 6.79 टक्के रिटर्न दिला आहे. या वर्षी हे शेअर्स 0.47 टक्क्यांनी वाढले आहेत गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स 9.04 टक्के आणि 1 महिन्यात 8.91 टक्क्यांनी वाढला आहे. 4 मे 2022 रोजी त्याने 52 आठवड्यांचा 848 रुपयांचा उच्चांक गाठला. याचा 52 आठवड्यांचा नीचांक 607 रुपये आहे जो 23 जून 2022 रोजी होता. Multibagger Stock
पुढे वाटचाल कशी असेल ???
ब्रोकरेज कंपन्यांचा असा विश्वास आहे की, या शेअर्समध्ये सध्या सुमारे 37 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. Chola Wealth Direct च्या मते, FY2023 मध्ये कंपनीच्या महसुलात 12-15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. फर्मने याला 1050 रुपयांचे टार्गेट प्राईस देताना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Multibagger Stock
कंपनी विषयी जाणून घ्या ???
जगातील पाचवी सर्वात मोठी एग्रोकेमिकल कंपनी असलेल्या UPL चा व्यवसाय सुमारे 138 देशांमध्ये पसरलेला आहे. ही एग्रीकल्चर व्हॅल्यू चेनशी संबंधित कंपनी आहे. यामध्ये पीक तयार करण्यापासून त्याचे वितरण, त्याचा पुरवठा आणि नवीन संशोधन या सर्व गोष्टींचा समावेश होतो. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.upl-ltd.com/
हे पण वाचा :
PIB Fact Check : SBI ने ट्रान्सझॅक्शनच्या नियमात केले बदल, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या
Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!
Stock Market : ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक !!!
Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!