हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. फायनान्सिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या Leasing Finance And Investment Company चे शेअर्स देखील गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. कधी काळी फक्त 1 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 10.01 रुपयांच्या पातळीवर आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या कंपनीने सुमारे 781 टक्के रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
हे लक्षात घ्या कि, या कंपनीच्या शेअर्सने 17.38 रुपयांच्या किंमतीसह आर्थिक वर्ष 2022-23 च्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. त्याच बरोबर या कंपनीचे शेअर्स 22 सप्टेंबर 2022 रोजी एक्स-स्प्लिट देखील झाले आहेत. त्यामुळे शेअर्सची ही किंमत 1:10 च्या प्रमाणात कंपनीने जाहीर केलेल्या स्टॉक स्प्लिटचा समावेश करून सांगण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये कंपनीचे स्टॉक स्प्लिट झाले
हे लक्षात घ्या कि, या वर्षी सप्टेंबरमध्ये हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक एक्स स्प्लिट झाला. संचालक मंडळाने BSE वर लिस्टेड असलेल्या या कंपनीचे शेअर्स 10 फेस व्हॅल्यूवरून 1 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्समध्ये स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला होता. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 17.38 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 4.23 रुपये आहे. Multibagger Stock
कंपनीच्या शेअर्सची किंमत जाणून घ्या
50 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या फायनान्स कंपनीने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 25 टक्के आणि गेल्या सहा महिन्यांमध्ये 36 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 3 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल
जवळपास पाच वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 रुपयांच्या पातळीवर होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी गुंतवणूकदारांना सुमारे 880 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात 25 टक्क्यांच्या रिटर्न सहीत 7.40 ते 9.25 रुपयांची पातळी गाठली तर गेल्या 6 महिन्यांत 36 टक्के रिटर्न सहीत 6.80 ते 9.25 रुपयांपर्यंतचा प्रवास केला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/leading-leasing-finance-and-investment-company-ltd/llficl/540360/
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या 3 वर्षांत ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सने दिला 3,900% रिटर्न
आता WhatsApp वर मिळवा SBI च्या सेवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Stock Tips : ‘हे’ 5 स्टॉक भविष्यात देऊ शकतील 45% पर्यंत रिटर्न, जाणून घ्या टार्गेट प्राइस
Investment Tips : आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अशा प्रकारे तयार करा 65 लाखांचा फंड
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये दररोज फक्त 50 रुपये जमा करून मिळवा 35 लाख रुपये