Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या एक वर्षापासून चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) च्या शेअर्सची गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची CPCL ही उपकंपनी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा यामध्ये 51.9% हिस्सा आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअर्समध्ये 11.42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NSE वर गुरुवारी हे शेअर्स 2.50 टक्क्यांच्या घसरणीने 312.00 रुपयांवर बंद झाले.

CPCL Recruitment 2022 Apply Online Now

बुधवारी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ​​शेअर्समध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. बुधवारी या कंपनीचे शेअर्स NSE वर 314.40 रुपयांवर बंद झाले होते. हे लक्षात घ्या कि, दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांची देखील या शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, कंपनीच्या एप्रिल ते जून 2022 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार डाली खन्ना यांच्याकडे एकूण 48,69,474 शेअर्स किंवा कंपनीमध्ये 3.27% हिस्सा आहे. Multibagger Stock

Multibagger Stock 2021 United Spirits Share Price Reach 886 Rupees Become Crorepati In 20 Years | Multibagger Stock: मल्टीबैगर शेयर ने बना दिया करोड़पति, ₹886 का हो गया ये ₹8.86 वाला स्टॉक, अभी भी ...

एका वर्षामध्ये 201% रिटर्न

गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये11.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्समध्ये 211.37 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 100.30 रुपयांवरून 311 रुपयांवर गेला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 209 टक्के रिटर्न दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या शेअर्सची किंमत 103.30 रुपये होती. त्याचप्रमाणे एका वर्षात या शेअर्सने 201 टक्क्यांनी झेप घेतली आहे. 25 ऑगस्ट 2021 रोजी 103.65 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 312 रुपयांवर आहे. Multibagger Stock

Multibagger Stocks Tips: दो महीने में पैसा डबल, इस टेक्सटाइल स्टॉक ने किया मालामाल! - Best multibagger stocks list investors return double lagnam spintex share price tuts - AajTak

6 महिन्यात गुंतवणूकदारांना केले मालामाल

जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 3,10,817 रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 2022 च्या सुरुवातीला यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 3,01,064 रुपये झाली असती. त्याचप्रमाणे एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 3,00,048 रुपये मिळाले असते. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://cpcl.co.in/

हे पण वाचा :

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, आजचे नवे दर तपासा

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

फिजिकल गोल्डप्रमाणे Sovereign Gold Bonds वर देखील कर्ज मिळेल का ???