Saturday, March 25, 2023

‘गेट वे ऑफ इंडिया’ पर्यटकांसाठी बंद; मुंबई हाय अलर्टवर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रसिद्ध असलेलं गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रायगड येथील हरिहरेश्वर समुंद्रकिनारी सापडलेल्या संशयित बोटीमुळे खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलीस सतर्क झाले असून गेट वे ऑफ इंडिया सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले आहे.

गेटवे ऑफ इंडिया इथे आता फक्त बोटीचं तिकिट असलेल्यांनाच आत सोडण्यात येत आहे. इतर कोणालाही तिथे प्रवेश दिला जात नाहीय. गेट वे ऑफ इंडिया’ नेमके किती दिवस बंद राहणार याबद्दल ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, पुढची सूचना येईपर्यंत गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रुमला परदेशातून धमकीचा मेसेज आला होता. मुंबईत लवकरच स्फोट होणार असून भारतातील ६ जण यामध्ये आम्हाला मदत करत आहेत असेही या धमकीच्या संदेशात म्हंटल होत. या एकूण सर्व प्रकरणामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आहेत.