Multibagger Stock : गोदरेज ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 22 वर्षात दिला 23404 टक्क्यांहून जास्त रिटर्न

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या काळात जागतिक मार्केटमध्ये मंदी सदृश वातावरण आहे. ज्यामुळे भारतीय बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यादरम्यान बाजार कधी अचानक वर जातोय तर कधी अचानक खाली येतो आहे. मात्र या अनिश्चिततेच्या काळातही गोदरेज ग्रुपच्या कंझ्युमर प्रोडक्ट्स कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळवून दिला आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत. शुक्रवारी हे शेअर्स 0.18 टक्क्यांनी वाढून 968.05 रुपयांवर बंद झाले. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, यामध्ये सध्याच्या पातळीपासून आणखी 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

This multibagger stock zoomed over 100% in one year; more upside likely -  BusinessToday

दीर्घकालावधीमध्ये दिला मजबूत नफा

2020 ते 2023 या आर्थिक वर्षांमध्ये तर गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या व्यवसायामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2017 आणि 2022 दरम्यान या कंपनीचा रिटर्न ऑफ कॅपिटल गेन (RoCE) सेल्स 52 टक्क्यांवरून 57 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 22 जून 2001 रोजी 4.12 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 968 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. गेल्या 22 वर्षात यामध्ये 23404 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. Multibagger Stock

गुंतवणूकदार झाले मालामाल

जर एखाद्याने 2001 मध्ये यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची रक्कम 2.35 कोटी रुपये झाली असती. अल्पावधीतही या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. 30 मार्च 2022 रोजी 699.75 रुपयांवर असलेल्या या शेअर्सने आता 900 चा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 39% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

1080 रुपयांपर्यंत होऊ शकेल वाढ शकतो

चार्टवरही हे शेअर्स मजबूत स्थितीत दिसून येत आहे. सध्या कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. कारण इथे विदेशी बाजारापेक्षा दुप्पट मार्जिन आहे. अशा परिस्थितीत, देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने यामध्ये गुंतवणूकीसाठी 1080 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www1.nseindia.com/live_market/dynaContent/live_watch/get_quote/GetQuote.jsp?symbol=GODREJCP

हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल