हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही कंपन्या देखील आहेत ज्या गुंतवणूकदारांना हजारो पट नफा मिळवून देत आहेत. एक लक्षात घ्या कि, शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्याची माहिती लोकांकडे नाही. सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेड ही देखील अशीच एक कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सची गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 5 वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांना 4 कोटींवर नेले आहे.
स्मॉल कॅप NBFC कंपनी असलेल्या सरस्वती कमर्शियल इंडिया लिमिटेडची मार्केटकॅप 336.89 कोटी रुपये आहे. BSE वर गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी) सरस्वती कमर्शियलचे शेअर्स 3,126.50 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. 13 जुलै 2017 रोजी सरस्वती कमर्शिअलच्या शेअर्सचे BSE वर पहिल्यांदा ट्रेडिंग सुरू झाले. यावेळी त्याची किंमत फक्त 8.40 रुपये होती. अशाप्रकारे गेल्या 5 वर्षांत या शेअर्सची किंमत 8.40 रुपयांवरून 3,271.05 रुपयांपर्यंत वाढली आहे. Multibagger Stock
गेल्या 5 वर्षात मिळाला 38,841% रिटर्न
या शेअर्सने ग्राहकांना 38,841.07% मोठा रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 13 जुलै 2017 रोजी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे मूल्य 3.89 कोटी रुपये झाले असते. तसेच जर एखाद्याने त्या वेळी यामध्ये फक्त 26 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
गेल्या एका वर्षात दिला 66% रिटर्न
गेल्या एका महिन्यात हे शेअर्स सुमारे 7.36 टक्क्यांनी घसरले आहे. 2022 च्या सुरुवातीपासून या शेअर्समध्ये सुमारे 19.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 66% रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या एका वर्षात त्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 4,600 टक्क्यांनी वाढ केली आहे. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
1983 मध्ये कोलकाता येथे स्थापना झालेली सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. तसेच ही एक नॉन बँकिंग फायनान्स सर्व्हिस कंपनी आहे जिचे मुख्यालय मुंबईत आहे. हे शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये कर्ज आणि गुंतवणूकीच्या व्यवसायात गुंतलेले आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.saraswaticommercial.com/
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ 6 योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!
Train Cancelled : रेल्वेकडून 159 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, नवीन दर पहा
‘या’ दिवाळी सेलमध्ये स्वस्त दरात iPhone 13 मिळवण्याची संधी !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल