हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देत आहेत. Usha Martin या कंपनीचे शेअर्स देखील असेच आहेत, या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. आता पुन्हा एकदा हे शेअर्स क्वांटम जंप करण्याच्या तयारीत आहे. आज (19 जानेवारी रोजी) इंट्राडेमध्ये 11.20 टक्क्यांनी वाढून 201.65 रुपयांच्या पातळीवर पोहोचल्याचे दिसून येत आहे. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत या शेअर्सची 571 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 29 टक्क्यांची वाढ झाली आहे.
याची खास बाब अशी कि, S&P BSE स्मॉलकॅप इंडेक्समध्ये Usha Martin चे शेअर्स या महिन्यात सर्वाधिक वाढला आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यातच स्टॉक एक्स्चेंजने या शेअर्समधील तेजीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. यावेळी दिलेल्या उत्तरात, कंपनीने एक्सचेंजला सांगितले की, कंपनीकडे कोणतीही विशिष्ट अशी माहिती नाही किंवा ते अशी कोणतीही नवीन घोषणा करणार नाही ज्यामुळे शेअर्सच्या किंमतीवर परिणाम होईल. उषा मार्टिनचे भारतातील रांची आणि होशियारपूर येथे वायर निर्मितीचे कारखाने आहेत. त्याच वेळी, कंपनीचे दुबई, बँकॉक आणि यूके येथे उत्पादन प्रकल्प आहेत. हे जाणून घ्या कि, उषा मार्टिन ही स्टील वायर रोप्स बनवणारी जागतिक उत्पादक कंपनी आहे. हे वायर्स, LRPC स्टँड्स, प्रीस्ट्रेसिंग मशीन आणि एक्सेसरीज आणि ऑप्टिकल फायबर केबल्स देखील बनवते. Multibagger Stock
शेअर्समध्ये झाली जोरदार वाढ
या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे 6 महिन्यांत या शेअर्सने 51.61 टक्के तर गेल्या एका वर्षात 111 टक्के तसेच, गेल्या 5 वर्षांत 573 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
15 जानेवारी 2021 रोजी 32 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 190 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. तसेच जर शेअर्समध्ये जर एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची रक्कम 596,250 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, जर वर्षभरापूर्वी एखाद्याने या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे पैसे आज 211,178 रुपये झाले असते. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/usha-martin-ltd/ushamart/517146/
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये