हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजार पैसे गुंतवण्याच्या लोकप्रिय माध्यमांपैकी एक आहे. याद्वारे अनेक लोकं काही वर्षांतच मालामाल झाले आहेत. मात्र त्यासाठी योग्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य वेळी पैसे गुंतवावे लागतील. तसेच यासाठी संयम असणेही गरजेचे आहे. इथे पैसे शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून नाही तर वाट पाहिल्याने मिळतात. कामा होल्डिंग्ज लिमिटेडच्या शेअर्सनेही दीर्घकाळामध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 20 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकच्या किंमतीत 84,000% ने वाढ झाली आहे. Multibagger Stock
BSE वर कामा होल्डिंग्जच्या शेअर्सचे 19 जुलै 2002 रोजी पहिल्यांदा ट्रेडिंग सुरु झाले. त्यावेळी त्याची किंमत फक्त 15.50 रुपये होती. तेव्हापासून, या शेअर्सची किंमत सुमारे 84,414 टक्क्यांनी वाढली आहे. हे लक्षात घ्या कि, BSE वर 20 ऑक्टोबर 2022 रोजी हे शेअर्स 13,099.70 रुपयांवर बंद झाले. तसेच आज 21 ऑक्टोबर रोजी हे शेअर्स इंट्राडेमध्ये 0.95 टक्क्यांनी घसरून 13,108 रुपयांवर ट्रेड करत होते. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना दिला मोठा नफा
या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळामध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 379 टक्के नफा दिला आहे. आजपासून पाच वर्षांपूर्वी त्याची किंमत 2732.85 रुपये होती. आज ते 13,108 रुपयांवर आहेत. तसेच गेल्या वर्षभरात शेअर्सच्या किंमतीत 24.94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हे शेअर्स सुमारे 23 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचबरोबर गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सच्या किंमतीत 15% वाढ झाली आहे तर गेल्या 1 महिन्यात या शेअर्सची किंमत 1.42 टक्क्यांनी वाढली आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
कामा होल्डिंग्जच्या शेअर्सनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. जर 20 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये एखाद्याने 12 हजार रुपये गुंतवले असतील तर आज तो करोडपती बनला असेल. त्यावेळी गुंतवलेल्या 12 हजार रुपयांची किंमत आज 1 कोटी रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने जुलै 2002 मध्ये यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याची गुंतवणूक 8 कोटी 45 लाख रुपये झाली असेल. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kamaholdings.com/
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर