हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या वर्षभरापासून घसरणीमध्ये असलेल्या Fineotex Chemical च्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार वाढ पहायला मिळाली. इंट्राडेमध्ये BSE वर आज हे शेअर्स 5.38 टक्क्यांनी वाढून 327 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तसेच गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये यामध्ये 22.75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार असलेल्या आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्येही हे शेअर्स सामील आहेत. Multibagger Stock
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, Fineotex ग्रुप कापड, मॅन्युफॅक्चरिंग, वॉटर-ट्रीटमेंट, खत, चामडे आणि पेंट इंडस्ट्रीसाठी एक प्रमुख केमिकल उत्पादक बनवणारी कंपनी आहे. Fineotex ही भारत आणि मलेशियामध्ये 1979 पासून टेक्सटाइल केमिकल्सचे उत्पादन करणारी मल्टीनॅशनल कंपनी आहे. Fineotex जगभरातील ग्राहकांना प्री-ट्रीटमेंट प्रोसेस, डाइंग प्रोसेस, प्रिंटिंग प्रोसेस आणि फिनिशिंग प्रोसेससाठी उत्पादने पुरवते. या कंपनीची 2011 मध्ये BSE वर तर 2015 मध्ये NSE वर लिस्टिंग करण्यात आली. Multibagger Stock
गुंतवणूकदारांनी केली भरपूर कमाई
गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यांत BSE वर या कंपनीच्या शेअर्समध्ये 52.77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 109 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 137 टक्के इतका रिटर्न दिला आहे. जर गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत Finotex चे शेअर्स 203 टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत हे शेअर्स 107 रुपयांवरून 327 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Multibagger Stock
जूनच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात झाली वाढ
2023 च्या आर्थिक वर्षांत पहिल्या तिमाहीत Fineotex ने चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान कंपनीचा नेट कंसोलिडेटिड प्रॉफिट 110 टक्क्यांनी वाढून 20 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी,वार्षिक आधारावर कंपनीचे उत्पन्न 115 टक्क्यांनी वाढून 136 कोटी रुपये झाले. Multibagger Stock
आशिष कचोलिया यांची हिस्सेदारी
शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार असलेले आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये फिनोटेक्स केमिकलचाही समावेश आहे. BSE वर जून 2022 तिमाहीसाठी कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचे 21,42,534 इक्विटी शेअर्स किंवा 1.93% हिस्सा आहे. कचोलियाच्या पोर्टफोलिओमध्ये हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रा कंपन्यांमधील स्टॉकचा समावेश आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://fineotex.com/
हे पण वाचा :
Business Idea : केळीच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे करा भरपूर कमाई !!!
SBI मध्ये 714 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज
Indian Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ !!! असे असतील नवीन व्याज दर
Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज 95 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 14 लाख रुपये !!!