हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजार हा पैसे मिळवण्याच्या सर्वांत लोकप्रिय मार्गांपैकी एक आहे. मात्र याद्वारे संयम बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांनाच मोठी कमाई मिळू शकते. मात्र इथे पैसे शेअर्स खरेदी-विक्रीने नाही तर वाट पाहून कमावता येतात. फेव्हिकॉलसारखे लोकप्रिय उत्पादन बनवणाऱ्या Pidilite Industries च्या शेअर्सने देखील हे खरे असल्याचे सिद्ध केले आहे. आजपासून 23 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदाराने यामध्ये पैसे गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक टिकवून ठेवली असेल तर आज त्यांना प्रचंड नफा झाला असेल.
NSE वर सोमवारी, 5 सप्टेंबर रोजी Pidilite Industries चे शेअर्स 2,839 रुपयांवर बंद झाले. 1 जानेवारी 1999 रोजी जेव्हा NSE वर याचे ट्रेडिंग सुरू झाले तेव्हा त्याच्या शेअर्सची किंमत फक्त 6.26 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 23 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 45,251.44 टक्के इतका मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
एका महिन्यात झाली 7 टक्क्यांनी वाढ
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या एका महिन्यात Pidilite Industries च्या शेअर्सची किंमत 7.16% टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 14.76 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या एका वर्षात हे शेअर्स 21.25 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे अडीच पट म्हणजे 236.51 टक्के वाढ केली आहे. त्याच बरोबर गेल्या 10 वर्षांत या शेअर्सची किंमत 1,280 टक्क्यांनी वाढली आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना केले मालामाल
दीर्घकालावधीत Pidilite Industries च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 23 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे आज करोडपती असतील. कारण या कालावधीत त्यांचे 1 लाख रुपये 4.53 कोटी रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे जर एखाद्याने 1 जानेवारी 1999 रोजी या शेअर्समध्ये फक्त 25 हजारांची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 1.13 कोटी रुपये मिळाले असते. Multibagger Stock
Pidilite ही लार्ज कॅप कंपनी आहे
हे लक्षात घ्या कि, लार्ज कॅप कंपनी असलेल्या Pidilite Industries ची मार्केट कॅप 1.44 लाख कोटी रुपये आहे. निफ्टी नेक्स्ट-50 इंडेक्समध्ये त्याचा समावेश आहे आणि सध्या तो 107.65 च्या PE वर ट्रेड करत आहे. Fevicol व्यतिरिक्त, Pidilite Industries मध्ये Feviquick, Doctor Fixit, Roff, Cyclo, Ranipal आणि MCL असे अनेक लोकप्रिय ब्रँड देखील आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pidilite.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर तपासा
Recession : मंदी येण्याची शक्यता असेल तर कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते समजून घ्या
Bank FD : फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट यापैकी कोणत्या FD मध्ये जास्त रिटर्न मिळेल ते समजून घ्या
Aadhaar Card मधील मोबाईल नंबर कसा बदलायचा ते जाणून घ्या !!!
HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा