हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकासाठी Aadhaar Card हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. आधारशिवाय कोणत्याही सरकारी कामापासून ते मुलाच्या शाळेतील प्रवेश मिळ्वण्यापर्यंत अडचण येऊ शकते. आधार कार्डमध्ये आपले नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखे महत्त्वाचे तपशील असतात. याबरोबरच आधार कार्डवर आपला बायोमेट्रिक डेटा देखील उपलब्ध असतात.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून आपल्याला आधार क्रमांक जारी केला जातो. UIDAI कडून लोकांना वेळोवेळी आपला मोबाईल क्रमांक तसेच इतर सर्व माहिती अपडेट करण्यास सांगते. अशा प्रकारे आपल्याला Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर देखील अपडेट करता येतो.
अनेकदा मोबाईल नंबर हरवतो किंवा बंद होतो. यामुळे जर आपण नवीन मोबाईल नंबर घेतला असेल तर तो UIDAI डेटाबेसमध्ये लगेचच अपडेट करा. Aadhaar Card मधील मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या…
>> सर्वांत आधी जवळच्या आधार केंद्रावर जा.
>> आधार अपडेट फॉर्म भरा.
>> आधार एक्झिक्युटिव्हकडे फॉर्म सबमिट करा.
>> यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.
>> आधार एक्झिक्युटिव्ह अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असलेली पावती देईल. URN क्रमांकाद्वारे अपडेट स्टेट्स तपासता येईल.
>> UIDAI डेटाबेसमधील मोबाईल नंबर 90 दिवसांच्या आत अपडेट केला जाईल. Aadhaar Card
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
Bank : सरकारी बँकांकडून डिसेंबरपर्यंत देशभरात उघडल्या जाणार 300 नवीन शाखा !!!
HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा
RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!
CSB Bank : 102 वर्षांच्या ‘या’ बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा