Multibagger Stock : घसरत्या बाजारपेठेतही ‘या’ फुटवेअर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला भरपूर नफा

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : फुटवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Liberty Shoes ने सध्याच्या घसरत्या बाजारपेठेतही गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. बुधवारी Liberty Shoes च्या शेअर्समध्ये15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यावेळी या शेअर्सची 286.35 रुपयांची पातळी गाठत गेल्या चार वर्षांतील उच्चांकाला गवसणी घातली आहे. त्याच वेळी, गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये यामध्ये 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Liberty Shoes Limited Karnal - Shoes Industry in Railway Road Karnal Haryana

सप्टेंबरमध्ये आतापर्यंत या शेअर्सने बाजाराला मागे टाकले आहे. कारण एकिडीए बाजारात घसरण होत असूनही त्यामध्ये 70 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सची किंमत दुपटीने वाढली आहे. Multibagger Stock

How to Find Multibagger Stocks That You Can Invest In

कोरोना महामारीनंतर कंपनीच्या व्यवसायात झाली वाढ

हे लक्षात घ्या कि, Liberty Shoes ही फुटवेअर बनवणारी प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीची एका दिवसात 50 हजारांहून जास्त शूज बनवण्याची क्षमता आहे. अलीकडेच कंपनीने नवीन रंगासह स्नीकर Leap7x ची नवीन श्रेणी लॉन्च केली. Liberty Shoes देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दहा वेगवेगळ्या ब्रँडचे उत्पादन करते. यामध्ये Leap 7X, Healer, Lucy & Luke आणि Aha कंपनीच्या मालकीचे ब्रँड समाविष्ट आहेत. या ब्रँड्सनी बाजारात चांगली कामगिरी केली आहे.

Multibagger stock turns 35 paise to Rs 209.85, delivers 59,857% return in less than 6 months | Markets News | Zee News

आपल्या व्यवसायाबाबत कंपनीने सांगितले की, आमचे लक्ष डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम आणखी मजबूत करण्यावर आहे. 10,000 हून जास्त शहरांमध्ये पोहोच वाढवली आहे. तसेच कोरोना महामारीनंतर आमच्या व्यवसायात वाढ झाली आहे. Multibagger Stock

कंपनीच्या व्यवसायामुळे आणि उत्तम व्यवस्थापनामुळे, बाजारातील तज्ञ Liberty Shoes बाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहेत. तांत्रिकदृष्ट्या देखील हा स्टॉक चार्टवर मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत, दीर्घ कालावधीसाठी त्याची खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.libertyshoesonline.com/

हे पण वाचा :

छोट्या शहरांमधील तरुणांमध्ये वाढतेय Online Dating App ची क्रेझ

‘या’ फार्मा कंपनीच्या Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षांत दिला कोट्यवधींचा नफा

Senior Citizen Savings Scheme द्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजची किंमत तपासा