RSS वरही बंदी घाला; लालूप्रसाद यादव यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारने ५ वर्षाची बंदी घातल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच पीएफआय आणि आरएसएस या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हंटल.

लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत म्हंटल की, पीएफआय प्रमाणेच, सर्व द्वेषयुक्त आणि द्वेष करणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे, ज्यामध्ये आरएसएसचा समावेश आहे. सर्वप्रथम आरएसएसवर बंदी घाला, ती त्याहूनही वाईट संघटना आहे. आरएसएसवर यापूर्वी दोनदा बंदी घालण्यात आली आहे. लोहपुरुष सरदार पटेल यांनी सर्वप्रथम आरएसएसवर बंदी घातली होती याची आठवणही त्यांनी करून दिली.

यापूर्वी काँग्रेस नेते के सुरेश यांनीही आरएसएस वर बंदी घाला असं म्हंटल होते. आरएसएस जातीयवाद पसरवत असल्याने त्यावर बंदी घातली पाहिजे. यानंतर इंडियन युनियन मुस्लिम लीगचे आमदार एमके मुनीर यांनीही याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला. यापूर्वी सिमीवरही बंदी घालण्यात आली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत केवळ बंदी घालणे योग्य पाऊल नाही असं त्यांनी म्हंटल