हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शॉक ऍब्जॉर्बर्स आणि फ्रंट फोर्क्स यांसारखी राइड कंट्रोल उत्पादने बनवणारी आघाडीची कंपनी असलेल्या गॅब्रिएल इंडिया शेअर्स देखील असेच आहेत. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. मात्र, यंदा गॅब्रिएल इंडियाच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्याच्या पातळीपासून या शेअर्समध्ये 17 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 2124.49 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचे शेअर्स मंगळवारी, BSE वर 4.35 टक्क्यांनी घसरून 135.50 रुपयांवर बंद झाले.
दीर्घ कालावधीमध्ये दिला जबरदस्त रिटर्न
2 नोव्हेंबर 2001 रोजी 1.35 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 135.50 रुपयांवर पोहोचले आहेत. यादरम्यान जर एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.10 कोटी रुपये झाले असते. अशा प्रकारे दीर्घ कालावधीमध्ये या शेअर्सने जबरदस्त रिटर्न दिला आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा 102.45 रुपये आहे तर गेल्या 52 आठवड्यांचा नीच्चांक 200.90 रुपये आहे. Multibagger Stock
झाली इतकी घसरण
200.90 रुपयांच्या पातळीनंतर या शेअर्सचा वेग थंडावला. आतापर्यंतच्या उच्च पातळीपासून ते 26 टक्के खाली आले आहेत. मात्र, येत्या काळात या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळू शकते, असे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या पाच दिवसांत यामध्ये 1.69 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच, गेल्या एका महिन्यात 9.34 टक्क्यांनी आणि गेल्या सहा महिन्यांत 9.84 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये ईव्हीचा वाटा 9 टक्के होता. ज्यामध्ये वार्षिक आधारावर तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. EV मध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 60 टक्के झाला आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये Ola, Ather, TVS, Ampere आणि Okinawa या कंपन्यांचा समावेश आहे. चांगले उत्पादन मिश्रण आणि किंमत वाढीच्या आधारावर डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 17 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/gabriel-india-ltd/gabriel/505714
हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव