‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून घसरणीमध्ये असलेला शेअर बाजार सध्या तेजीत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. आयशर मोटर्स या कंपनीच्या शेअर्सचा देखील मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये समावेश होतो. चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेली आयशर मोटर्स ही लार्ज-कॅप आणि ब्लू-चिप कंपन्यांपैकी एक आहे. जीची मार्केट कॅप 93,569.71 कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Multibagger Stock

Eicher's new Dealership facility at NH-27 - Siliguri Observer

NSE वर शुक्रवारी आयशर मोटर्स लिमिटेडचे ​​शेअर्स 3,422.10 रुपयांवर ट्रेड करत होते. यावेळी दिवसभरात एकूण 1,038,097 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. गेल्या 20 दिवसांत सरासरी 1,258,822 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. गेल्या 23 वर्षांत गुंतवणूकदारांना या शेअर्सने 280,998.36 टक्के इतका रिटर्न मिळवून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी 1.22 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 3,422.10 रुपयांवर आहे. जर एखाद्याने 23 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून ती तशीच ठेवली असेल तर आज त्याची गुंतवणूक 28.10 कोटी रुपये झाली असेल. Multibagger Stock

Four money tasks you should do in the new financial year 2022-23

अशा प्रकारे शेअर्समध्ये झाली वाढ

गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 7% वाढ झाली असली तरी गेल्या तीन वर्षात त्याने 110.48% इतका मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. त्यासोबतच गेल्या वर्षभरात या शेअर्समध्ये 22.36% वाढ झाली. तसेच 2022 मध्ये आतापर्यंत तो 26.14% वर चढला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्समध्ये 42.33% वाढ झाली आहे तर गेल्या एका महिन्यात 9.02% वाढला आहे. NSE वर 25 ऑगस्ट 2022 रोजी या शेअर्सने 3,513.70 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक तर 8 मार्च 2022 रोजी 2,159.55 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक नोंदवला. Multibagger Stock

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

आयशर मोटर्सचे आर्थिक निकाल

आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत आयशर मोटर्सने एकत्रित आधारावर 3,397 कोटी रुपयांची निव्वळ विक्री नोंदवली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,974 कोटी रुपयांवरून 72.10 टक्क्यांनी जास्त आहे. यावेळी कंपनीच्या एकूण खर्चात वार्षिक आधारावर 59.3% वाढ होऊन ते 1,611 कोटी रुपयांवरून 2,566 कोटी रुपये झाली. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा 106 टक्क्यांनी वाढून 758 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर निव्वळ नफा (करानंतरचा नफा) 157 टक्क्यांनी वाढून 611 कोटी रुपये झाला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.eicher.in/

हे पण वाचा :

CSB Bank : 102 वर्षांच्या ‘या’ बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा

Bank FD : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार 1 टक्का जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!

Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!

आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या

Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा