हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 1200 हून जास्त अंकांच्या तर निफ्टी 350 हून जास्त अंकांच्या घसरणीने उघडला. आज बाजारात प्रचंड घसरण होत असतानाही कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये मात्र प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे.
कोहिनूर फूड्सच्या शेअर्स बाबत बोलायचे झाल्यास हा शेअर गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना भरपूर रिटर्न देत आहे. आज 13 जून रोजी या शेअर्समध्ये 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 65.35 रुपयांवर ट्रेड बंद झाला आहे. हे लक्षात घ्या कि, अदानी ग्रुपने नुकतेच कोहिनूर ब्रँडचे अधिग्रहण केले आहे. ज्यानंतर या शेअर्सने जोरदार उडी घेतली आहे. या शेअर्सवर शेअर बाजाराच्या घसरणीचाही परिणाम झालेला नाही. Multibagger Stock
कोहिनूर फूड्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने 174 टक्के रिटर्न दिला आहे. 13 मे रोजी या शेअरची किंमत 24.60 रुपये होती, ती आज 67.60 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे हा शेअर गेल्या दोन महिन्यांत 584 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्सने 21 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. कोहिनूर फूड्सची मार्केट कॅप सध्या 242.24 कोटी रुपये आहे.
या शेअर्समध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे मूल्य 684,179 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असतील तर त्याला आज 274,794 रुपये मिळले असतील.
कोहिनूर फूड्स बाबत बोलायचे झाल्यास ही कंपनी खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि मार्केटिंग मधील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनी कडून कोहिनूर ब्रँड नावाने बासमती तांदळाच्या अनेक जाती विकल्या जातात. कोहिनूर फूड्सकडे मजबूत पुरवठा साखळी नेटवर्क आहे. तसेच कंपनी बासमती तांदळाव्यतिरिक्त रेडिमेड करी, रेडीमेड ग्रेव्ही, कुकिंग पेस्ट, चटनी मसाले आणि सीज़निंग पासून ते फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स आणि खाद्यतेल देखील विकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kohinoorfoods.in/
हे पण वाचा :
Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 5 पट नफा !!!
Multibagger Stocks: ‘या’ 4 आयटी स्टॉक्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट रिटर्न !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!