हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येतो आहे. मात्र या अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची संख्या वाढलीआहे. दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. गेल्या काही वर्षांत दीपक नायट्रेट शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. मात्र गेल्या एका वर्षापासून हा शेअर विक्रीच्या टप्प्यातून जात आहे. Multibagger Stock
NSE वर गेल्या 10 वर्षांत, दीपक नायट्राइट कंपनीच्या शेअर्सची किंमत ₹16.95 वरून ₹2,030 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत दीपक नायट्रेटने आपल्या गुंतवणूकदारांना 11,875 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये आता मोठे गुंतवणूकदार देखील गुंतवणूक करत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, विमा कंपनी LIC ने देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. Multibagger Stock
दीपक नायट्रेट शेअर्सविषयी जाणून घ्या
या कंपनीचे शेअर्स गेल्या एका वर्षापासून विक्रीच्या टप्प्यातून जात आहे. गेल्या वर्षभरात तो सुमारे 5 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच गेल्या 5 वर्षांत या शेअर्सची किंमत अंदाजे ₹145 वरून ₹2,030 पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे भागधारकांना 1,280 टक्के रिटर्न मिळाला आहे. गेल्या 10 वर्षांत या शेअर्समध्ये 119 पटीने वाढ झाली आहे. Multibagger Stock
फंडिंग वर परिणाम
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता ते ₹ 80,000 पर्यंत खाली आले असतील. मात्र त्याच वेळी, जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये ₹ 1 लाख गुंतवले असतील तर त्याचे 13.80 लाख मिळाले असतील. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी यामध्ये ₹ 1 लाख गुंतवले असतील तर त्याला आज ₹ 1.19 कोटी मिळाले असतील. Multibagger Stock
या केमिकल्स स्टॉकची सध्याची मार्केट कॅप ₹27,985 कोटी आहे आणि शुक्रवारी सकाळच्या ट्रेडिंगमध्ये त्याचा व्यवसाय सुमारे ₹4.88 लाख आहे. त्याची 52-आठवड्यांची उच्च किंमत ₹3,020 आहे तर त्याची 52-आठवड्यांची नीचांकी ₹1,681.15 आहे. त्याची प्रति शेअर किंमत 244.77 रुपये आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.godeepak.com/
हे पण वाचा :
‘या’ 5 चुकांमुळे थांबवला जाऊ शकतो ITR Refund !!!
RBI कडून रेपो दरातील सलग तिसऱ्या वाढीनंतर आता पुढे काय होणार ??? अशा प्रकारे समजून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन भाव तपासा
महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ
ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!