हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही काळापासून केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. अनेक केमिकल कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्टमध्ये सामील होत आहेत. याच लिस्टमध्ये Vinati Organics या कंपनीचे नाव देखील सामील आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 156,659% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून लोकं मालामाल झाले आहेत.
Vinati Organics Limited ही कंपनी स्पेशल केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करते. लार्ज-कॅप कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीची मार्केटकॅप 21,435.20 कोटी रुपये आहे. भारतीय शेअर बाजाराच्या निरीक्षकांनी पाहिलेल्या काही मल्टीबॅगर स्टॉकपैकी Vinati Organics देखील एक आहे. मात्र लिस्टिंगनंतर या कंपनीकडून एकदा बोनस शेअर्स जाहीर करण्यात आले आहेत. Multibagger Stock
Vinati Organics च्या शेअर्स विषयी जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, बीएसईवर शुक्रवारी Vinati Organics चे शेअर्स 2085.50 रुपयांवर बंद झाले. 14 जुलै 1995 रोजी 1.33 रुपये किंमत असलेले हे शेअर्स सध्या 2085.50 रुपयांच्या पातळीवर आहेत. गेल्या 27 वर्षांमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना 156,659.40% इतका मोठा मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. Multibagger Stock
BSE वर या शेअर्सने 24/02/2022 रोजी 52-आठवड्याच्या उच्चांकावर (2,372.95 रुपये) तर 24/02/2022 रोजी या शेअर्सने 1,675.00 या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. BSE वर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, या कंपनीकडून 22 नोव्हेंबर 2007 रोजी 1:2 च्या प्रमाणात 1 बोनस शेअर देखील जाहीर करण्यात आला आहे. Multibagger Stock
1 लाख रुपये झाले 23 कोटी रुपये
सुरुवातीच्या टप्प्यात शेअर्सची किंमत 1.33 होती जर एखाद्याने त्या वेळी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्यांच्याकडे आत्ता 75,187 शेअर्स असतील. मात्र कंपनीकडून बोनस शेअर्स मिळाल्या नंतर एकूण शेअर्सची संख्या 1,12,780 शेअर्सवर पोहोचली असेल. तसेच सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 23.52 कोटी रुपये झाली असेल. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://vinatiorganics.com/
हे पण वाचा :
Bank Of India ने FD वरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवीन दर
Stock Market : जागतिक बाजार अन् परदेशी गुंतवणूकदारांसह ‘हे’ घटक ठरवणार शेअर बाजाराची दिशा
Gold Price : सोने-चांदी महागले, या आठवड्यात सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
Repo Rate वाढल्याचा पर्सनल-एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या