देवीचे दर्शन घेऊन परतत असताना भीषण अपघात! 1 ठार तर 2 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिरवळ : हॅलो महाराष्ट्र – खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी एक भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) एक जण ठार तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हे सगळे लोक कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे येत असताना हा अपघात (accident) झाला. कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार महामार्गाच्या बाजूला लावली. यादरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिली आणि हा अपघात (accident) झाला.

हा अपघात (accident) आज सकाळी पहाटे 3.20 च्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि, आकुर्डी,पुणे येथील डि.वाय.पाटील एमबीए महाविदयालय याठिकाणी विविध पदांवर कार्यरत असलेले अरुण बाबू पाटील, संदिप नारायण पाटील,प्रशांत भास्करराव क-हाळे,सोमनाथ मारुती हडलगेकर,विशाल तानाजी माने हे मिञ कोल्हापूर याठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी कोल्हापूर येथे देवीचे व जोतिबाचे दर्शन घेऊन पुण्याकडे येत असताना कारचालक अरुण पाटील यांना अचानकपणे उचकी व शिंका येत उलटी होऊ लागल्याने शिरवळ ता.खंडाळा येथील पंढरपूर फाटा येथील महामार्गालगत कार थांबवून खाली उतरले. यानंतर कारमध्ये पाठिमागे बसलेले प्रशांत क-हाळे हे कारचालकाच्या दरवाज्याजवळ येऊन थांबले असताना सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला पाठिमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात (accident) प्रशांत क-हाळे हे गंभीर जखमी झाले तर सोमनाथ हडलगेकर व विशाल माने हे किरकोळ जखमी झाले. यानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रशांत क-हाळे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी अरुण पाटील यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन टेम्पोचालक बंदेनवाज गुलाब शेख (रा.भिवंडी,ठाणे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार,पोलीस अंमलदार संजय सकपाळ,शिवराज जाधव हे करीत आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती