Multibagger Stock : एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Income tax
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी देखील सेन्सेक्स 632.13 अंकांच्या किंवा 1.17 टक्क्यांच्या वाढीसह 54,884.66 वर बंद झाला. त्याच बरोबर आज निफ्टी मध्ये देखील वाढ झाली. तो 182.30 अंकांच्या वाढीसह 16,352.45 वर बंद झाला. आजच्या वाढीचा परिणाम हा मल्टीबॅगर स्टॉक असलेल्या कोहिनूर फूड्सवरही झाला आहे.

3 मे रोजी अदानी विल्मरने कोहिनूर ब्रँड विकत घेतला. ज्यानंतर कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. मॅककॉर्मिक स्वित्झर्लंड GmbH कडून अदानी विल्मर लिमिटेडने कोहिनूर ब्रँड खरेदी करण्याची घोषणा केली होती. यामुळे अदानी विल्मरने भारतात कोहिनूर ब्रँड अंतर्गत रेडी टू कुक, रेडी टू ईट ग्रेव्ही आणि कोहिनूर बासमती तांदूळ ब्रँड मिळवला आहे. हे लक्षात असू द्या कि, कोहिनूर बासमती ब्रँड हे भारतातील तांदळाच्या ब्रँड मधील एक लोकप्रिय नाव आहे. Multibagger Stock

Multibagger Stocks 2021 bharat rasayan give 40k % retrun rs 25k became 1.14  crore high return stock see detail | 22 रुपये के शेयर ने लोगों को बना दिया  करोड़पति! मिला ₹4.5

कोहिनूर फूड्सच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 158.59% चा मोठा रिटर्न दिला आहे. 29 एप्रिल रोजी हा शेअर 14.85 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, शुक्रवारी 27 मे रोजी त्याची किंमत 38.40 रुपये झाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअर्समध्ये 21.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोहिनूर फूड्सच्या शेअर्सने सहा महिन्यांत 395.49 टक्क्यांचा जोरदार रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Multibagger Stock: Rs 1 lakh turns into Rs 7.2 crore in 20 years - Know more

जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 2,58,585 रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याची गुंतवणूक 4,95,475 रुपये झाली असेल.

Kohinoor Foods Limited

कोहिनूर फूड्स ही खाद्यपदार्थांची निर्मिती आणि मार्केटिंग करणारी देशातील आघाडीच्या कंपनीपैकी एक आहे. कंपनी कोहिनूर ब्रँड नावाने बासमती तांदळाच्या अनेक जाती विकते. कोहिनूर फूड्सकडे मजबूत पुरवठा साखळी नेटवर्क आहे. कोहिनूर बासमती तांदळाव्यतिरिक्त रेडीमेड ग्रेव्ही, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले आणि सीझनिंग पासून फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स आणि खाद्यतेल देखील विकते.Multibagger Stock

Kohinoor Foods and McCormick dispute heads for arbitration in London |  VCCircle

कोहिनूर फूड्सच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kohinoorfoods.in/

हे पण वाचा :

Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Cruise Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आर्यन खानला क्लीन चिट !!!

RBI FD Rules : RBI कडून FD च्या नियमांत बदल, नवीन नियम जाणून घ्या

EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या