हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Multibagger Stock) आजकाल प्रत्येक व्यक्ती सुरक्षित भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला प्राधान्य देतेय. गेल्या काही काळात शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच वाढली आहे. दरम्यान, आज आपण रिलायन्सच्या अशा एका शेअरविषयी जाणून घेणार आहोत ज्याने फक्त आणि फक्त चार वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरने शेअर मार्केटमध्ये चांगली प्रगती केली आहे. ज्यामुळे आपसूकच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी या शेअरमूळे गुंतवणूकदार चांगलेच खुश झाले आहेत.
५२ आठवड्यांचा नवा उच्चांक (Multibagger Stock)
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. नुकताच शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४ रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्याने शेअर्सची किंमत वाढली आहे. आत्ताच्या घडीला या शेअर्सची किंमत वाढून २८६.७० रुपयांवर येऊन पोहोचली आहे.
४ वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल
गेल्या ४ वर्षांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये चांगली प्रगती झाली असून या वर्षांमध्ये शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान या शेअर्समध्ये जवळपास ३ हजार टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. (Multibagger Stock) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स हे २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपयांवर होते. त्याच शेअर्सने आता २२ मार्च २०२४ रोजी २८६.७० रुपयांचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी २०२० साली या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि त्यांनी आपली गुंतवणूक कायम केली असेल त्यांना आत्ताच्या परिस्थितीत मोठा फायदा झाला असेल.
कारण, २०२४ मध्ये या शेअर्सचे मूल्य ३१.१६ लाख रुपये झाले असेल. यानुसार गेल्या वर्षभरात या शेअर्सनमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. गतवर्षी २३ मार्च २०२३ रोजी हेच शेअर्स १४८.१० रुपयांवर होते. यानंतर आता २२ मार्च २०२४ रोजी या शेअर्सने २८६.७० रुपयांचा उच्चांक गाठला. परिणामी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. (Multibagger Stock)