हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजारात बराच चढ उतार होतो आहे. कधी तो वर जातोय तर दुसऱ्या दिवशीच एकदम खाली येतो. मात्र, बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांच्यवर बाजारातील या चढ उताराचा काहीही परिणाम झालेला नाही. गुजरात कॉटेक्स लिमिटेडचा शेअर देखील सध्या अशाच शेअर्समध्ये येतो ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. शुक्रवारीही या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. यावेळी त्याने आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. आज त्यात 4.96 टक्के वाढ झाली. आज तो 10.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. गुजरात कॉटेक्स लिमिटेड विषयी बोलायचे झाले तर ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिची मार्केटकॅप 15.38 कोटी रुपये आहे. Multibagger Stock
एका वर्षात दिला 583 टक्के रिटर्न
या शेअर्सने गुंतवणूकदारांना गेल्या एक वर्षापासून मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. गेल्या एक वर्षात या शेअर्समध्ये 583.54 टक्क्यांची वाढ झाली आहे. 9 जून 2021 रोजी या शेअरची किंमत 1.58 रुपये होती, जी आज 10.80 रुपये झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्समध्ये 644 टक्क्यांची वाढ झाली असून 10.80 रुपयांवर पोहोचला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 459 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये 22.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 21.35 टक्क्यांनी वाढला आहे. Multibagger Stock
6 महिन्यांत 1 लाख रुपयांचे 7,44,822 रुपये झाले
सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे एक लाख रुपये 744,822 रुपयांपर्यंत वाढले असतील. त्याचप्रमाणे एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 6,83,542 रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://blog.finology.in/investing/multibagger-stocks-2022
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
FD Rates : आता ‘या’ खाजगी बँकेने देखील आपल्या FD वर व्याजदरात केली वाढ !!! नवे दर पहा
Bank FD : ‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या FD चे व्याजदर !!!
Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज