हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : गेल्या काही महिन्यांत भक्कम कामगिरी करून गुंतवणूकदारांना मोठी कमाई मिळवून देणाऱ्या दोन मल्टी-ट्रेड शेअर्सवर बुधवारी बाजाराचे लक्ष असेल. पॉंडी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड, राम रत्न वायर्स आणि एक्सेल रियल्टी अँड इन्फ्रा या कंपन्यांच्या शेअर्सची 28 सप्टेंबर रोजी एक्स-बोनस डेट आहे. या दोन्ही शेअर्समध्ये मंगळवारी सुमारे पाच टक्क्यांनी घसरण झाली आहे.
हे लक्षात घ्या कि, बोनस शेअर्स हे कंपनीने कंपनीकडून आपल्या सध्याच्या भागधारकांना कोणतेही शुल्क न घेता दिलेले अतिरिक्त शेअर्स असतात. मात्र हे शेअर्स सध्याच्या भागधारकांना त्यांच्या कंपनीतील होल्डिंगच्या आधारावर दिले जातात.
1:1 बोनस शेअर्स जाहीर
पॉंडी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीकडून आपल्या भागधारकांना 1:1 बोनस इश्यू जाहीर करण्यात आला आहे. आता कंपनी रेकॉर्ड डेटला पात्र भागधारकांना प्रत्येक शेअरमागे एक शेअर देईल. बोनससाठी भागधारकाची पात्रता तपासण्यासाठी पॉंडी ऑक्साइड्स अँड केमिकल्सकडून 29 सप्टेंबर बोनसची डेट निश्चित करण्यात आली आहे. Multibagger Stocks
BSE वर आज या शेअर्समध्ये सुमारे पाच टक्क्यांनी घसरूण झाली आहे. आता त्याची किंमत 1025.25 रुपये प्रति शेअर झाली आहे. भारतातील अग्रगण्य सेकंडरी लीड स्मेल्टर्सपैकी POCL हे एक आहे. ही कंपनी शिसे आणि शिसे मिश्रित धातु, झिंक मेटल, झिंक ऑक्साईड आणि पीव्हीसी एडिटीव्ह तयार करते. गेल्या एका वर्षात या कंपनीने 150% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात यामध्ये 325% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. Multibagger Stocks
29 सप्टेंबर रोजी बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट
राम रत्न वायर्स या कंपनीच्या संचालक मंडळाकडूनही 1: 1 च्या प्रमाणात बोनस घोषित करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत सध्याच्या पात्र भागधारकांना प्रत्येक शेअरमागे आणखी एक शेअर दिला जाईल. या बोनससाठी कंपनीकडून 29 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, कोणत्याही कंपनीकडून निश्चित करण्यात आलेली कट ऑफ डेट ही रेकॉर्ड डेट म्हणून ओळखली जाते. जर गुंतवणूकदार या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स ठेवत असेल तर त्याला बोनस शेअर्सचा लाभ मिळेल. Multibagger Stocks
BSE वर आज राम रत्न वायर्सचा शेअर्सही जवळपास पाच टक्क्यांनी घसरून 415.65 रुपयांवर आले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे शेअर्स आपल्या 126.20 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. यानंतर येथून त्याने जवळपास 250 टक्क्यांनी उडी घेतली आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pocl.com/
हे पण वाचा :
Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहेत ‘हे’ प्रीमियम 4K स्मार्ट टीव्ही
Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये
FD Rates : आता ‘या’ 2 बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
EPFO : पीएफ खाते क्रमांकामध्ये लपली आहे ‘ही’ खास माहिती, त्याविषयी जाणून घ्या
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 259% रिटर्न