हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : कोरोना महामारीच्या काळातही आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती. मात्र बाजारातील सध्याच्या अस्थिरतेमुळे आयटी कंपन्या दबावात आहेत. असे असूनही अशा काही आयटी कंपन्या आहेत ज्यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक करणे फायद्याचे मानले जाते. काही पेनी स्टॉक्स वगळता असेही काही आयटी शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.
Infobeans टेक्नोलॉजीज
Infobeans टेक्नोलॉजीज ही पारंपारिक आणि नॉन-डिजिटल बिझनेस प्रोसेस आणि सर्व्हिस डिजिटलमध्ये रूपांतरित करण्यासाठी डिजिटल टेक्नोलॉजी प्रोव्हाइड करते. कंपनीच्या इतर सर्व्हिसेस मध्ये Product Engineering, OpenText, Salesforce इ. देखील सामील आहेत. या कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 122 टक्के इतका चांगला रिटर्न दिला आहे. Multibagger Stocks
Tata Alexi
ही कंपनी ऑटोमोटिव्ह, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन्स, हेल्थकेअर, ट्रान्सपोर्टेशन इत्यादी उद्योगांना डिझाइन आणि टेक्नोलॉजी सर्व्हिस देणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. त्याची मार्केट कॅप 54,036.96 कोटी रुपये आहे. टाटा ग्रुपची कंपनी असलेल्या Tata Alexi ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात 132 टक्के इतका मोठा रिटर्न दिला आहे. Multibagger Stocks
KPIT टेक्नोलॉजीज
स्मॉल कॅप IT कंपनी असलेल्या KPIT Technologies च्या स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 117 टक्के रिटर्न दिला आहे. ही कंपनी जागतिक स्तरावर ऑटोमोटिव्ह कंपन्यांना सॉफ्टवेअर पुरवते. ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटीवर लक्ष केंद्रित करते. देशांतर्गत बाजारपेठेशिवाय या कंपनीचा व्यवसाय जर्मनी, अमेरिका, जपान, कोरिया, चीनमध्ये पसरलेला आहे. Multibagger Stocks
एक्सप्लो सोल्यूशन्स
स्मॉल कॅप आयटी कंपनी असलेल्या एक्सप्लो सोल्यूशन्सने यावर्षी (YTD) 116 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. यापूर्वी कंपनी SQS India BFSI लिमिटेड म्हणून ओळखली जायची. हा एक्स्प्लो ग्रुपचा एक भाग आहे, जो बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्शिअल सर्व्हिस क्षेत्रांना सर्व्हिस देते. या कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस चेन्नई येथे आहे. तसेच त्यांचे ग्राहक आशिया-पॅसिफिक, अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये आहेत. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.livemint.com/market/stock-market-news/multibagger-stocks-these-5-shares-give-up-to-1765-return-in-jan-march-2022-11648877849204.html
हे पण वाचा :
Credit Card चा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या !!!
Business ideas : पांढर्या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!
Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली, नवीन दर तपासा
Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे Home Loan, RBI ने वाढवली मर्यादा