Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विमानाचा अपघात; Air India चा टायर फुटला अन …

Mumbai Airport Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. हे विमान कोचीहून मुंबईला आले होते. त्यावेळी लँडिंग करताना विमानाचे ३ तयार फुटले. पायलटच्या प्रसंगवधाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, आणि विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोचले. मात्र या घटनेने एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.

नेमकं काय घडलं? Mumbai Airport

२१ जुलै २०२५ रोजी कोचीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाईट एआय-२७४४ च्या लँडिंग दरम्यान मुसळधार पाऊस पडला. हवामान खराब असल्यामुळे लँडिंगदरम्यान, काही क्षणातच विमानावरील नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून घसरले. यावेळी विमानाचे ३ तयार फुटले. तसेच एका इंजिनला नुकसान झाल्याचे दिसून येते.इंजिनचा एक भाग धावपट्टीच्या डांबरी भागावर आदळला. मात्र, वैमानिकच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

या घटनेनंतर मुंबई विमानतळाने (Mumbai Airport) एक निवेदन जारी केले. त्यात म्हंटल कि, २१ जुलै रोजी कोचीहून मुंबईच्या दिशेनं येणारं एआय २७४४ हे विमान लँडिंगनंतर धावपट्टीवरून घसरले. मात्र, वैमानिकच्या सर्तकतेमुळे विमान सुरक्षितरित्या गेटपर्यंत पोहोचले. यानंतर सीएसएमआयएच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना तात्काळ सक्रिय करण्यात आले. विमान लँड झाल्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं असे निवेदनात म्हटले आहे. विमानतळाची प्राथमिक धावपट्टी – ०९/२७ ला सुद्धा या अपघातामुळे किरकोळ नुकसान झाल्याची नोंद आहे. कामकाज सुरू राहावे यासाठी, दुय्यम धावपट्टी १४/३२ – सक्रिय करण्यात आली आहे. सीएसएमआयएमध्ये, सुरक्षितता नेहमीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असते,” असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर सातत्याने विमानाच्या तांत्रिक अडचणीच्या आणि इमर्जन्सी लँडिंगच्या बातम्या समोर येत आहेत. मागच्या सोमवारी तर मुंबई विमानतळावरच (Mumbai Airport) उभ्या असलेल्या अकासा विमानाला एका मालवाहतूक ट्रकने धडक दिली. या धडकेत विमानाच्या पंखाचे थोडेफार नुकसान झालं होते. सदर विमान हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. त्याच वेळी एक मालवाहतूक करणारा ट्र्क विमानाच्या संपर्कात आला. आणि विमानाला धडक दिली. या धडकेत कर्मचाऱ्यांना किंवा प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र घटनास्थळावरील एका फोटोमध्ये विमानाचा एक पंख ट्रकमधून किंचित बाहेर पडल्याचे दिसून आलं होते.