हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport Bomb Threat । मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका अज्ञात कॉलवरून देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे एकामागून एक सलग ३ फोन कॉल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा फोन कोणी केला? यामागच्या सूत्रधार कोण आहे? याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
टर्मिनल 2 वर बॉम्ब- Mumbai Airport Bomb Threat
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात (Mumbai Airport Bomb Threat) आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा सदर कॉल वरून करण्यात आला होता. या कॉलनंतर, मोठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांचे पथक तत्काळ सतर्क झाले आणि पोलिस अधिकाऱी, तसेच बॉम्ब शोध पथकाने थेट विमानतळ गाठलं. पोलिसांनी बराच वेळ विमानतळावर शोध मोहीम राबवली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता, ज्यामध्ये मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने बॉम्ब पथकाला घटनास्थळी बोलावून शोध मोहीम सुरू केली. मात्र हाती काहीच लागलं नाही.
हा फोन कुठून केलाय ते तपासण्यासाठी पोलिस फोन कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात बॉम्बची धमकी देणारा (Mumbai Airport Bomb Threat) फोन नंबर आसाम किंवा पश्चिम बंगालचा असल्याचे समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. खरच यामागे कोणते षडयंत्र आहे का? कि कोणीतरी मस्करी म्हणून धमकीचे कॉल केले? याचा तपास केला जाईल. कारण यापूर्वी असं अनेकदा घडलं आहे.
यापूर्वीही मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी अनेकदा मिळाली होती. गेल्या ३ महिन्यांत मुंबई विमानतळावर अनेक वेळा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. १७ मे, २७ मे आणि १७ जुलै रोजी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. मात्र पोलीस तपासात या सगळ्या धमक्या खोट्या असल्याच निष्पन्न झालं. परंतु अशा धमक्यांमुळे लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. तसेच गैरसोयीचा सामना करावा लागतो.




