हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bomb Blast Threat । उद्या अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन… मुंबई पुण्यासारख्या मोठया शहरात गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर गर्दी करतात आणि वाजत गाजत गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. गणेश विसर्जनाच्या दृष्टीने मुंबईत ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरु असतानाच आता मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. उद्या मुंबई बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असून त्यासाठी 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX तयार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे.
14 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले – Mumbai Bomb Blast Threat
गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशीच मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज मिळाला आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचं या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. यामध्ये म्हंटल आहे कि उद्या मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहे. या स्फोटांमध्ये ४०० किलो आरडीएक्स वापरला जाईल… ज्यामुळे जवळपास १ कोटी माणसे मारली जातील. धमकी देणाऱ्या व्यक्तीने लष्कर-ए-जिहादी” नावाच्या गटाचे नाव पुढे नमूद केले आहे. आणि १४ पाकिस्तानी दहशतवादी आधीच शहरात घुसले असल्याचा दावा केला आहे. या धमकीच्या मेसेज मुळे (Mumbai Bomb Blast Threat) मुंबईत खळबळ उडाली आहे.
तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये-
मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांनी ही धमकी (Mumbai Bomb Blast Threat) गांभीर्याने घेतली आहे. त्यानुसार सायबर आणि दहशतवादविरोधी युनिट्सना त्याचे मूळ शोधण्यासाठी तैनात करण्यात आले आहे, शहरातील महत्वाचे चौक, धार्मिक मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा धमकीचा मेसेज कुठून आला आणि यात किती सत्यता आहे याची माहिती आम्ही घेत आहोत. नागरिकांना शांत राहावे. कोणतीही संशयास्पद हालचाली दिसली तर याबाबत माहिती द्या.
दरम्यान, मुंबईत उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका निघालेल्या दिसतील. खास करून परळ-लालबाग आणि गिरगाव चौपाटीला गणेश भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), परळचा राजा (नरेपार्क), परळचा महाराजा, परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी निघणार आहे. त्यामुळे अर्धी मुंबई उद्या रस्त्यांवर असेल. एकीकडे सर्वत्र गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना मुंबईत बॉम्बस्फोटांची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.




