मुंबई । आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा लौकिक असलेल्या धारावीतही नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यात येत होतं. अशातच धारावीतील अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. अजगर आल्याचं वृत्त धारावीच्या गल्लीबोळातून वाऱ्यासारखं पसरलं. धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात अजगर शिरला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या कौलात हा सहा फूट लांबीचा अजगर शिरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
अजगर आल्याचं समजताच मुंबई पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव या शिपायाने जीवाची बाजी लावत अजगराची सुटका केली. मुरलीधर जाधवांनी अगदी सहजरित्या अजगराला घरातून बाहेर काढलं आणि त्याची सुरक्षित सुटका केली. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.
अजगर घरात शिरल्यामुळे रात्रीच्या वेळी धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. ‘मुंबई पोलीस जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अजगराचे फोटो-व्हिडीओ, मुरलीधर जाधवांना शेकहँड करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलिसांना गर्दीला पांगवलं.
व्हिडिओ सौजन्य- @vaibhavparab21
धारावीतल्या घरात सहा फुटी अजगर शिरला होता @MumbaiPolice दलात काम करणारे मुरलीधर जाधव यांनी अजगराला सुखरूप बाहेर काढलं, जाधव यांचं पोलिस दलात कौतुक होत आहे @abpmajhatv pic.twitter.com/fvv1b0YTjx
— Vaibhav Parab – वैभव परब (@vaibhavparab21) January 1, 2021
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’