हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Girls Disappeared । मुंबई… देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी म्हणून ओळखले जाणारे शहर, गरीबाच्या हाताला काम देणार शहर, जीवाची मुंबई असेही मुंबईबाबत बोललं जाते. देशभरातुन मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईला येतात, कामधंदा करतात आणि इथेच कायमचे स्थायिक होतात. उत्तरप्रदेश- बिहार मधून मुंबईत येणाऱ्या लोकांची जास्त आहे त्यामागचं कारण म्हणजे मुंबईची सुरक्षितता.. मुंबई हे देशातील सुरक्षित शहर मानले जाते. मात्र आता याच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मागील ६ महिन्यात मुंबईतून २६८ मुली गायब झाल्यात. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतून ३७० हून अधिक किशोरवयीन मुले- मुली बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २६८ मुली आहेत, मुली गायब होण्याचे प्रमाण हे तब्बल ७२ टक्के आहेत. आकडेमोड काढली तर दर महिन्याला सरासरी ६० मुले बेपत्ता होतात. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. Mumbai Girls Disappeared
मुली कशामुळे बेपत्ता झाल्या? Mumbai Girls Disappeared
मुली इतक्या मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होण्याची कारणे वेगवेगळी आणि तितकीच गंभीर आहेत. अनेकद प्रेम प्रकरणांमुळे अल्पवयीन मुली मित्रांसोबत जातात किंवा घराबाहेर पडतात. तसेच यामध्ये मानव तस्करी, जबरदस्तीने पळवणे असे प्रकारही समोर आल्याची माहिती पोलिसांच्या मिसिंग पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल ट्रॅकिंग आणि स्थानिक माहिती वापरून बेपत्ता मुलांचा शोध घेतला जातोय, परंतु दरमहा दाखल होणाऱ्या नवीन तक्रारींची वाढच्या संख्येमुळे मिसिंग पर्सन सेलसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. पालकांव्यतिरिक्त, कुटुंबे आणि शाळा प्रशासनानेही किशोरवयीन मुलांच्या बदलत्या वर्तनावर, बदलांवर आणि सोशल मीडियावरील ऍक्टिव्हिटी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः पालकांनी, मूल अचानक बेपत्ता झाल्यास, कोणताही उशीर न करता त्वरित पोलिस तक्रार दाखल करावी. कारण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हाला एखादे बेपत्ता मूल सापडले तर लगेच 100 किंवा 112 वर त्वरित फोन करा.अल्पवयीन असल्यास चाइल्डलाइन 1098 वर संपर्क साधा. जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा. trackthemissingchild.gov.in या सरकारी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवा.




