Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? गडकरींनी तारीखच सांगून टाकली

Mumbai Goa Highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Goa Highway । मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर बहुप्रतिक्षित मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा आणि आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकणवासीय आतुरतेने वाट पाहतोय. मात्र काही कारणांनी हा महामार्ग मागील दहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे. परंतु आता या मार्गाबाबत नवीन डेडलाईट समोर आली आहे. आज संसदेत मुंबई गोवा महामार्ग बाबत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याचे अपडेट्स दिले आहेत.

संसदेत काय घडलं ? Mumbai Goa Highway

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर निशाणा साधला. मुंबई- गोवा महामार्गासाठी ‘चांद्रयान मोहिमेपेक्षा जास्त खर्च झाला आहे, तरीही काम अपूर्ण का?’ तुम्ही यात जातीनं लक्ष घाला. तरच काहीतरी होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे त्यामुळं नागरिकही आता वैतागले आहेत. हे काम पूर्ण कधी होणार? असं अरविंद सावंत नितीन गडकरींना उद्देशून म्हणाले. सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हे सांगितलं. Mumbai Goa Highway

काय म्हणाले गडकरी ?

मुंबईत गोवा महामार्गाचे काम 2009 मध्ये सुरू झालं आणि मी मंत्री 2014 साली झालो. त्यामुळं जुन्या सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काम दिले होते. यात जमीन संपादनाचा मुख्य अडथळा होता. अनेक कंत्राटदार बदलण्यात आल. अनेकदा कारवाई सुद्धा करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गाचे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, एप्रिल २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि नागरिकांचा त्रासही संपेल. खूप विलंब झाला हे मान्य करतो, असे गडकरी म्हणाले. त्यामुळं मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आता एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.