महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग होय – उच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महिलांच्या विनयभंग प्रकरणी शिक्षा करण्याबाबत अनेक कठोर कायदे न्यायालयाच्यावतीने करण्यात आलेले आहेत. महिलेच्या विनयभंगबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून मध्यरात्री तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे.

सध्या मुंबई उच्च न्यालयातील न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठासमोर जालना जिल्ह्यातील 36 वर्षीय परमेश्वर ढगे याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी सुरु आहे. शेजारी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवित न्यायालयाने त्याला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला ढगे यांनी औरंगाबाद खंडपीठात आ‍व्हान दिले.

न्यायालयाने संबंधित आरोपीला शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीनेही याबाबात न्यायालयास आव्हान दिले. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान पार पडलेल्या युक्तिवादावेळी न्यायमूर्ती सेवलीकर यांनी ढगे यांचे कृत्य महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवणारे होते. संबंधित युवक हा पीडितेच्या पायाजवळ बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. तो तिच्या खाटेवर बसला होता. हे त्याचे वर्तन लैंगिक हेतूने होते. तसेच रात्रीच्या वेळी त्याने पीडितेच्या घरी जाण्याचे अन्य कोणतेही कारण नव्हते.” असे न्यायमूर्तींनी म्हटले.

यावेळी पार पडलेल्या युक्तिवादावेळी ढगे याने न्यायालास समाधानकारक उत्तर देऊ दिले नसल्याने न्यायालयाने आपला निर्णय सुनावत म्हंटले की, रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग करणे होय. त्यामुळे ढगे याला विनयभंग प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविण्यात कोणतीही चूक केली नाही,” असे निरीक्षण खंडपीठाच्यावतीने नोंदविण्यात आले.

नेमका काय घडला प्रकार

जालना जिल्ह्यात जुलै 2014 मध्ये आरोपी परमेश्वर ढगे याने सायंकाळच्या वेळी पीडितेच्या घरी जात आणि तिला तिचा पती घरी कधी परत येणार असे विचारले. तिने त्याला सांगितले की, तिचा नवरा परगावी गेला आहे आणि तो रात्री परत येणार नाही. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ढगे पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेला, तेव्हा पीडिता झोपली होती. त्याने तिच्या घराचा दरवाजा उघडला. दरवाजाला आतून कडी नव्हती. आणि तो तिच्या खाटेवर जाऊन बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. दरम्यान, आरोपीने आपला बचाव करत दावा केला की त्याचा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे सांगितले. मात्र, न्यालयाने त्यास शिक्षा सुनावली.

Leave a Comment