मुंबई । कोरोना महामारीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असताना कोरोनाच्या थैमानात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असतानाही मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या तणावात आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचं मत नोंदवलं (Mumbai high court praise the Mumbai Police for working amid Covid-19 pandemic and lockdown).
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने गुरुवारी (29 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांनी कठीण काळात भन्नाट काम केल्याचं म्हटलं. तसंच त्यांची जगभरात वाहवा होत असून मुंबई पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जातात, असं मत नोंदवलं.
न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, “साथीरोगाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांची ड्युटी खूप कठीण होती. मुंबई पोलीस आधीच खूप तणावात आहेत. त्यांना 12-12 तास ड्युटी करावी लागते. त्यानंतर येथे मिरवणूक, मोर्चे यांचा बंदोबस्त देखील असतो. अशा विपरीत परिस्थितीत मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाते. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांकडूनही त्यांना सहकार्य अपेक्षित आहे.”
जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?, अशोक चव्हाणांचा सवाल
वाचा सविस्तर -👉 https://t.co/iBt2UP9h70@AshokChavanINC @INCMaharashtra #MarathaReservation @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 30, 2020
US Election:राजकीय वारं बदलणाऱ्या 'त्या' वादळी सभेची पुनरावृत्ती थेट अमेरिकेत; बायडन यांचं भर पावसात जोरदार भाषण
वाचा सविस्तर -👉 https://t.co/gqcjlWmvwD @PawarSpeaks @JoeBiden #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 30, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in