आज अकराच्या ठोक्यालाचं ‘न्यू इअर’ सेलिब्रेशन घ्यावं लागणार आटोपतं, कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘न्यू इअर’चे स्वागत करताना रात्री ११ वाजल्यानंतर हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट बंद राहणार असून, राज्यात सर्वांनाच रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुंबईकरांना गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, वेसावे, मढ अशा सागरी किनाऱ्यांवर 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

‘कोरोनाचे संकट अजूनही समोर उभे आहे. हे लक्षात ठेवून नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने आणि शांततेत करावे. घराबाहेर न पडता घरात बसूनच सरत्या वर्षाला निरोप द्यावा. तसेच, रात्री ११ नंतर हॉटेल, पब, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही, असे नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाइकांकडे जायचे असेल, तर रात्री अकरानंतर जाऊ शकता. फक्त सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये,’ असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत दर वर्षी ‘थर्टी फर्स्ट’ला ज्या ठिकाणी गर्दी होते, त्याबाबत राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह व अन्य समुद्रकिनाऱ्यांवर पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment