मुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी

0
43
mumbai indians
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली असून आता परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. आता घरी नक्की जायचं कस असा प्रश्न खेळाडूंपुढे असताना अशातच आता मुंबई इंडियन्स त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार आहेत. मुंबई इंडियन्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.

८ फ्रँचायझींपैकी फक्त मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे की ज्यांनी त्यांच्या परदेशी खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्समध्ये मायेदेशात पाठवणार आहेत. त्यांचे हे चार्टर्ड फ्लाईट्स न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व्हाया दक्षिण आफ्रिका या मार्गे जातील. त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंना सोबत पाठवण्यास सांगितले होते.

https://www.instagram.com/p/COcjpnPqgaT/?igshid=16pxao1ccxq05

दरम्यान आयपीएल मधील खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेत खेळाडुची काळजी महत्त्वाची आहे असं सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here