मुंबई इंडियन्सने 10 कोटी मध्ये घेतले ‘हे’ 3 जागतिक दर्जाचे गोलंदाज ; गोलंदाजीची धार अजून मजबूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2021 साठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. दरम्यान, गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 10.60 कोटी रुपये खर्च करुन तीन नवे गोलंदाज ताफ्यात सामावून घेतले आहेत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी अजून मजबूत झाली आहे. तीन नव्या गोलंदाजांसह मुंबईचा संघ सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

लिलावापूर्वी मुंबईकडे 15 कोटी 35 लाख रुपयांची राशी उपलब्ध होती. मुंबईचा संघ त्यांच्या ताफ्यात 7 नवे खेळाडू समावून घेऊ शकतो. त्यापैकी 10.60 कोटी रुपये मुंबईने खर्च केले आहेत आणि यात मुंबईने तीन नवे गोलंदाज संघात घेतले आहेत. न्युझीलंड चा अॅडम मिल्ने, ऑस्ट्रेलियन फास्टर नॅथन कुल्टर नाईल आणि भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावला असे 3 जागतिक दर्जाचे गोलंदाज मुंबईच्या संघाने खरेदी केले.

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी आधीच मजबुत असून या तीन गोलंदाज्यांच्या समावेशाने मुंबईची गोलंदाजी अजून मजबूत झाली आहे. तर फलंदाजी मध्ये रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव असे आक्रमक फलंदाज मुंबईच्या चमूत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment