सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 57 हजार 825 वर; गृहराज्य मंत्र्यांच्या सतर्क राहण्याच्या सुचना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात 74 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार 825 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बधितांच्या संख्या 5 हजाराच्या वर गेली असून आज 5 हजार 427 रूग्णांचे निदान झाले. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 20 लाख 81 हजार 520 इतकी झाली आहे. राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 40 हजार 858 पर्यंत खाली आली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 55016 आहे. तर आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 1845 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 890 जण उपचारार्थ रुग्णालयांत दाखल आहेत.