हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4 वेळचे आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत एकूण 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे.मुंबईचा संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असून मुंबई इंडियन्सला हरविण्यासाठी अन्य संघांना चांगलाच घाम गाळावा लागतो.
स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजयी लय कायम राखावी लागेल, असे मत कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर व्यक्त केले.‘आमची कामगिरी चांगली होत असून पुढे अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. अखेरच्या टप्प्यात काय घडते हे सर्वांना ठाऊक आहे. आम्ही ज्या योजना आखल्या त्यानुसार वाटचाल सुरू आहे. ही अखेर नाही आणि सुरुवातदेखील नाही. प्रत्येक विजय हा पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास प्रदान करतो. स्पर्धेच्या मध्यभागी असल्याने एकाग्रतेने खेळावेच लागेल’ अस रोहित म्हणाला.
आक्रमक सलामीवीर, अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि टिच्चून गोलंदाजी करणारे गोलंदाज हे मुंबईच्या विजयाचे गमक असून कर्णधार रोहित शर्माच्या यशस्वी नेतृत्वामुळे मुंबईने खूप मोठी भरारी घेतली आहे.यंदाही आयपीएल विजेतेपदासाठी मुंबईच फेव्हरेट असून मुंबई आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा यावेळीही पूर्ण करेल का हे पाहणं महत्त्वाचे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’