हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबई इंडिअन्सला नेहमीप्रमाणे पहिल्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या आरसीबीच्या संघाने मुंबईला धूळ चारली. अटीतटीच्या या सामन्यात अखेर आरसीबीने विजय मिळवत आपलं गुणांचे खातं उघडलं.
मिडल ऑर्डर ढासळली –
ख्रिस लिन आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी करत मुंबईसाठी 1 चांगला प्लॅटफॉर्म ठेवला होता. परंतु ते दोघे बाद होताच मुंबईची फलंदाजी गडगडली. हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृनाल पंड्या हे आक्रमक फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले.
हर्षल पटेल ठरला मुंबईचा कर्दनकाळ –
पहिल्या सामन्यात हिरो ठरला तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेल. आजच्या सामन्यात बंगळुरुकडून गोलंदाजी करताना हर्षलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला. मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका यंदादेखील कायम ठेवली आहे. 2013 पासून आतापर्यंत दरवर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत होत आहे. सलग 9 वर्ष मुंबई सलामीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. या 9 वर्षात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, परंतु सलामीच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page