हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेतमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली. यंदाच्या मोसमातील मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला. सलामीवीर क्विंटन डी कॉक मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. डी कॉकने नाबाद 78 धावा केल्या. या खेळीसाठी डी कॉकला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
A comprehensive win for the @mipaltan here in Abu Dhabi. They win by 8 wickets against #KKR.
Quinton de Kock remains unbeaten on 78.#Dream11IPL. pic.twitter.com/BDhMILSKI0
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
” विजयी लक्षाचं पाठलाग करताना विजय मिळवल्यानंतर संघाचा आत्मविश्वास आणखी दुणावतो. आम्ही यंदाच्या मोसमातील पहिल्या टप्प्यात फार कमी वेळा विजयी आव्हानाचं पाठलाग केले. कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात आम्ही बॅटिंग आणि बोलिंग या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. आम्ही सामन्यावर सुरुवातीपासून घट्ट पकड बनवून ठेवली होती. तसेच आम्ही केलेली रणनितीही यशस्वी ठरली”, असं कर्णधार रोहित म्हणाला.
#MumbaiIndians are back on top in the Points Table after Match 32 of #Dream11IPL. pic.twitter.com/eRf9uQ2YRq
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची विजयी घोडदौड चालू असून या विजयासह मुंबई इंडिअन्सचा संघ गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी असून प्ले ऑफ मधील त्यांचं स्थान जवळ जवळ फिक्स झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’