हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी आगामी IPL 2023 मिनी लिलावापूर्वी BCCI कडे त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सने आपला मुख्य खेळाडू कायरन पोलार्ड यालाही रिलीज केलं आहे. त्यामुळे इथून पुढे पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या जर्सीत आपल्याला दिसणार नाही.
पोलार्ड सोबत मुंबईने फॅब ऍलन आणि टायमल मिल्स, मयंक मारकंडे आणि ऋतिक शौकिन यांना रिलीज केलं आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता पण गेल्या मोसमात त्याला संघर्ष करावा लागला. IPL 2022 मध्ये पोलार्डला ११ सामन्यात केवळ १४४ धावाच करता आल्या होत्या. त्याचा मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसला होता. त्यामुळे त्याला करारमुक्त करण्यात आलं आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला संघात कायम ठेवले आहे. चेन्नईने ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल आणि मिचेल सँटनर, नारायण जगदीशन या ४ खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. आयपीएल 2023 मिनी लिलाव डिसेंबरमध्ये कोची येथे होणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.