Wednesday, February 1, 2023

पुण्यात गोळीबार करत लुटले 28 लाख; आरोपी पसार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बंदुकीचा धाक दाखवून तब्बल २८ लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी चोरटयांनी गोळीबारही केला. लुटलेला पैसे घेऊन चोरटे पसार झाले असून पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून चोरटयांनी बंदुकीचा धाक दाखवत २८ लाख रुपयांची रोकड लुटली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी एकूण ५ जणांनी अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी गोळीबारही केला आणि एकूण २८ लाख रुपये लुटले.

- Advertisement -

चोरट्यांच्या गोळीबारात सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेननंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलील कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत