भारतीय संघात स्थान मिळत नाही ; मुंबईच्या सुर्यकुमार यादवला मिळाली ‘या’ देशाकडून खेळण्याची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडिअन्सच्या स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने काल रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. सुर्यकुमार यादवच्या या खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सुर्यकुमारला स्थान न दिल्याने सर्वच स्तरातून निवड समितीवर टीका होत आहे. दरम्यान आता सूर्यकुमारच्या ही कारकिर्द एका वेगळ्या वळणावर आली आहे, कारण न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याने असा सवाल उपस्थित केला आहे की, सूर्यकुमार वेगळ्या आंतराराष्ट्रीय संघाकडून खेळू इच्छितो का?

सूर्यकुमारने बुधवारी मुंबईसाठी अवघ्या 43 बॉल्समध्ये 79 रन्सची धमाकेदार खेळी केली. आरसीबीने दिलेले 165 धावांचे लक्ष्य सूर्यकुमारच्या या खेळीमुळे सहज साध्य करता आले. यामुळे मुंबई इंडियन्सने 5 विकेट्स राखून सामना आपल्या खिशात घातला. याच विजयानंतर स्कॉटने सूर्याबाबत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (MI vs RCB) हा सामना झाल्यानंतर अनेक दिग्गजांनी सूर्यकुमारचे कौतुक करणारे ट्वीट्स केले आहेत. स्कॉट स्टायरिसने देखील गमतीशीर ट्वीट केलंआहे आणि त्याने सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून खेळायची इच्छा आहे का असं विचारलं  आहे. स्कॉटने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘मला आश्चर्य वाटतं आहे की जर सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची इच्छा असेल तर तो परेशात येऊ शकतो.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड न होणं हे त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक होतं. कारण गेल्या 2-3 वर्षात सूर्यकुमार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल तसंच देशांतर्गत सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे निवड समितीने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का वगळले असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment